लॉकडाऊन: पुणेकरांकडून मदतीचा हात, मजूरांना जेवण वाटप

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना बसला आहे. या मजूरांच्या मदतीला पुणेकर धावून आले आहेत. पुण्यातल्या शिवाजीनगर भागामध्ये स्थानिक नागरिकांकडून मजूरांना जेवण वाटप करण्यात आले.


लॉकडाऊनमुळे पुण्यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हातात काम नसल्यामुळे दोन वेळचे खाणे आणि राहणे या मजूरांना कठीण झाले आहे. त्याचसोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. कोणी खायला दिले तर खायचे नाही तर पाणी पिवून हे मजूर झोपतात.